बहादुरगड : महिला व मुलींच्या अत्याचारत वाढ होताना आपल्याला दिसते. अश्यातच मुलीव महिला या घरात देखील सुरक्षित नाही आहेत.बहादुरगड येथे अशीच एक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने भावाने मुलीला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका 23 वर्षीय तरुणीचे तिच्या गावातील एका तरुणासोबत संबंध होते.या प्रेम संबंधातून मुलगी गरोदर राहिली.ही माहिती घरी समजताच कुटुंबीयांचा संताप अनावर झाला.त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला जंगलात नेले आणि जिवंत जाळण्याच्या उद्देशाने तिच्या पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले.या घटनेत मुलीची आई आणि भावाचा हात असल्याचा आरोप आहे.
या आगीमध्ये पीडित मुलगी 70 टक्के भाजली. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांना माहितीमिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे.