………. अन् मुलीनं केली आईची हत्या

अनैतिक संबंधातून अनेक प्रकारच्या घटना  घडल्याच्या आपल्याला दिसून येत आहेत. मात्र गुजरात मध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गुजरात राज्यातील भुज येथे रहाणाऱ्या एका मुलीने आपल्या जन्म देणाऱ्या आईलाच जीवनातून उठविल्याची घटना समोर आली आहे. तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.

उघडकीस आलेल्या प्रकरणातून असे समोर आले कि आई आणि मुलीचे एकाच एकाच व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते.तर आईला प्रियकरासोबत आपल्या असलेले प्रेम मान्य नव्हतं. म्हणून मुलीने आपल्या प्रियकरासोबत मिळून  आईची हत्या केली. व  हत्या केल्यानंतर दोघांनी मृतदेह समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूत पुरून टाकला. याप्रकरणी पोलीसांनी तीन लोकांना अटक केली आहे.