---Advertisement---
नंदुरबार : विवाहित प्रियकराने बोलायचे बंद केल्याच्या रागातून प्रेयसीने प्रियकराची दुचाकी आणि घरातील कपडे जाळून टाकले. ही घटना २८ जून रोजी असली, ता. धडगाव येथे घडली. प्रियकराच्या पत्नीने ४ जुलै रोजी फिर्याद दिल्याने संबंधित प्रेयसीविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---
पोलिस सूत्रांनुसार, असली येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचे लगतच्या एका पाड्यातील महिलेशी प्रेमसंबंध होते. परंतु काही दिवसांपासून प्रियकराने त्या प्रेयसीची बोलणे बंद केले होते. त्यामुळे चिडलेल्या त्या प्रेयसीने त्याला माझ्याशी बोल, संपर्क ठेव म्हणून तगादा लावला. तसे केले नाही तर तुझी दुचाकी जाळून टाकेन आणि आपल्याकडे असलेले कागदपत्रे देणार नाही म्हणून धमकी दिली होती.
याच वादातून २८ जून रोजी कथित प्रेयसीने प्रियकराचे घर गाठून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी जाळून टाकली, घरातील दोन चादरी आणि मुलांचे वापरते कपडे देखील जाळून टाकले. यात एकूण ४५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. याबाबत संबंधित प्रेयसीविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किरण वळवी करीत आहे.
मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा
नंदुरबार : शहरातील नवनाथ नगर भागातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पालकांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून १६ वर्षीय युवतीला अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.