---Advertisement---

Delhi Election Result 2025: ‘आप’चा पराभव होताच अण्णा हजारे आक्रमक; केजरीवालांबाबत दिले धक्कादायक वक्तव्य, पहा VIDEO

by team
---Advertisement---

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप सध्या ४४ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष (आप) २६ जागांवर लढत देताना दिसत आहे. काँग्रेसला मात्र अपेक्षेप्रमाणे मोठा धक्का बसला असून, त्यांना एकही जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या पराभवावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे यांचा घणाघाती हल्ला

अण्णा हजारे म्हणाले,”आम आदमी पक्षाच्या पराभवामागे भ्रष्टाचार आणि दारूच्या दुकानांचे मुद्दे आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीभर दारू दुकाने सुरू केली. त्यांनी पैसा आणि संपत्ती मिळवण्यासाठी राजकारण केले. त्यामुळेच लोक त्यांच्याविरोधात गेले आणि आता त्यांना मतांचा फटका बसला आहे.”

हेही वाचा : दिल्लीत भाजपची मुसंडी; ‘या’ कारणांमुळे ‘आप’चा पराभव

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे की, उमेदवाराचे चारित्र्य चांगले असले पाहिजे. त्याची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. पण केजरीवाल आणि ‘आप’ पैशाच्या मोहात पडले. त्यामुळेच त्यांच्या प्रतिमेला डाग लागला आणि लोकांनी त्यांना नाकारले.”

अण्णा हजारे ‘आप’चा भाग का झाले नाहीत?

अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की, त्यांनी सुरुवातीपासूनच आम आदमी पक्षापासून स्वतःला दूर ठेवले होते.

“जेव्हा ‘आप’ स्थापन झाला, तेव्हा मी स्पष्ट केले होते की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा भाग होणार नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतात. पण केजरीवाल चारित्र्याच्या शुद्धतेबद्दल बोलतात आणि दुसरीकडे दारूच्या व्यवसायात गुंततात, हे लोकांनी पाहिले आहे. त्यामुळेच त्यांचा पराभव होत आहे.”

‘आप’चा पराभव का? – प्रमुख कारणे

लिकर घोटाळ्याचा मोठा फटका – दिल्लीतील दारू घोटाळ्यामुळे ‘आप’ची प्रतिमा मलिन झाली. केजरीवाल आणि अन्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला.

अतिरिक्त विश्वास आणि अहंकार – ‘आप’ने जनतेचा फीडबॅक न घेता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली.

INDIA आघाडीचा कमकुवत पाठिंबा – दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्षांनी ‘आप’ला अपेक्षित पाठिंबा दिला नाही.

भाजपाची जोरदार प्रचारमोहीम – भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अत्यंत काटेकोर प्रचार केला, ज्यामुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूने गेला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment