गूगल : जगातील सर्वात मोठी टेक कंपनीने मागे कोरोनाच्या काळात नोकर कपात केली होती. परत एकदा गूगलने नोकर कापत केली आहे आणि जानेवारी महिन्यात गुगलने 6 टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने कर्मचारी कपातीचा एजेंडा निवडला आहे. पण ही नोकर कमी स्वरूपात आहे असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे. कपात सत्रामुळे गुगल गेल्या तीन महिन्यात अशी करणारी जगातील पहिली टेक कंपनी ठरली आहे.
गूगल मालक अल्फाबेटने याआधी देखील म्हणजे जानेवारी महिन्यात हजारो कर्मचाऱ्यांना बाहरेचा रस्ता दाखवला होता. आकड्यानुसार, कंपनीने 12,000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यामुळे कंपनीचे एकूण मनुष्यबळ 6 टक्के कमी झाले. नोकर कपातीनंतर सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी गुगलवर सुटकेचा श्वास घेतले आहे. त्यांनी सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रात्रीतूनच कंपनीच्या बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. जानेवारी महिन्यानंतर आता मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे. पण यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यांच्या मते, भरती प्रक्रिया राबवितानाच अति प्रमाणात भरती करणे योग्य नाही. कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन कमी करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींनीमुळे कर्मचारी नाराज झाल्याचे बोलले जात आहे.