PM Modi visits Nigeria देशाेदेशींच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी घेण्याचा आणि तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधत, उभय देशांचे संबंध दृढ करण्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा सिलसिला सुरूच आहे. २०१४ मध्ये माेदींनी भारताचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर देशाच्या परराष्ट्र धाेरणात इतके बदल केले की, कुण्या एकेकाळी जागतिक क्रमवारीत नाेंदही न घेतल्या जाणाऱ्या या देशाच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या पाचापर्यंत मजल मारली. आज जगाचा अग्रेसर म्हणून भारत मान्यता पावत आहे. देशात महाराष्ट्र आणि झारखंड या दाेन राज्यांमध्ये सुरू असलेला प्रचार साेडून पंतप्रधानांनी परवा नायजेरियाची राजधानी गाठली. PM Modi visits Nigeria या देशाचे राष्ट्रपती अहमद टिनुबू यांनी पंतप्रधानांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ या सर्वाेच्च राष्ट्रीय सन्मानाने पुरस्कृत केले. नायजेरियाचा सर्वाेच्च सन्मान मिळविणारे पंतप्रधान माेदी हे दुसरे परदेशी व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या आधी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना १९६९ मध्ये हा सन्मान देण्यात आला हाेता. आतापर्यंत १५ देशांनी पंतप्रधान माेदींना त्यांच्या सर्वाेच्च सन्मानाने गाैरविले असून त्यांना मिळालेला हा १७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. PM Modi visits Nigeria हा सन्मान १४० भारतीयांना आणि भारत-नायजेरिया यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला समर्पित करताे, असे माेदी म्हणाले.
हा पुरस्कार आम्हाला दाेन्ही देशांमधील धाेरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत राहील, ही बाबही त्यांनी स्पष्ट केली. पंतप्रधानांचा नायजेरिया दाैरा उभय देशांमधील संबंधांच्या दृष्टीनेच नव्हे, तर ‘ग्लाेबल साऊथ’साठी भारताच्या वचनबद्धतेचे पाऊल म्हणूनही महत्त्वाचा आहे. PM Modi visits Nigeria याआधी तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी २००७ मध्ये अबुजाला भेट दिली हाेती. या भेटीनंतर १७ वर्षांनी माेदी या देशात पाेहाेचले. यावेळी भारत आणि नायजेरियामध्ये संरक्षण सहकार्यासह विविध मुद्यांवर धाेरणात्मक भागीदारीची घाेषणा करण्यात आली. दहशतवाद, अलिप्ततावाद, चाचेगिरी आणि अमली पदार्थांची तस्करी ही दाेन्ही देशांसमाेरील आव्हाने आहेत. गरिबी, प्रदूषण आणि लाेकसंख्येची घनता या समस्यांचाही उभय देश सामना करीत आहेत. त्या आव्हानांचा एकत्रितरीत्या सामना करण्याबाबत या दाैऱ्यात एकमत झाले. PM Modi visits Nigeria या भेटीदरम्यान झालेल्या करारानुसार भारतार्ते नायजेरियातील पूरग्रस्तांसाठी २० टन धान्य पाठविले जाणार आहे. १९६० मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने नायजेरियात शिक्षक आणि डाॅक्टर पाठविले हाेते. तेथे सुमारे ६० हजार भारतीय स्थायिक झाले असून पूल बांधणारा समाज म्हणून त्यांची ख्याती आहे.
सुमारे २०० भारतीय कंपन्यांनी नायजेरियात फार्मा, आराेग्य सेवा, कृषी आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. जीडीपीच्या बाबतीत नायजेरिया आि्रकेतील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आता ताे ब्रिक्सचा भागीदार देश आहे. भारताच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदा नायजेरिया जी-२० परिषदेत सहभागी झाला हाेता, ही बाब येथे सांगितली जायला हवी. PM Modi visits Nigeria नायजेरियात राहणारे भारतीय दाेन्ही देशांमधील महत्त्वाचा दुआ आहेत, असे प्रतिपादन देशाच्या राष्ट्रपतींसाेबत झालेल्या भेटीदरम्यान माेदींनी केले आणि त्यांना येथे राहू दिल्याबद्दल तसेच त्यांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी नायजेरियाचे आभारही मानले. पंतप्रधान नायजेरियाची राजधानी अबुजा येथे पाेहाेचताच स्वतः राष्ट्रपतींनी विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे केलेले स्वागत, या देशाच्या नेतृत्वाला माेदींबद्दल असलेली आपुलकी दर्शवून गेले. तेथे राजधानी अबुजाच्या चाव्या पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. आदर आणि विश्वासाचे हे प्रतीक म्हणावे लागेल. भारतीय समुदायाने विमानतळावर हातात तिरंगा घेऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी सरकारर्ते गार्ड ऑफ ऑनर आणि २१ ताेफांची सलामी माेदींना देण्यात आली.
नायजेरियातील प्रसिद्धी माध्यमांनी या दाैऱ्याला दिलेली प्रसिद्धी बघता, माेदींची भेट त्यांच्यासाठी किती महत्त्वाची हाेती हे दिसून येते. काेविड काळात भारताने नायजेरियाला सर्वप्रकारे मदत केली हाेती, ही बाब ध्यानात घेतली जायला हवी.
तेल आणि वायूच्या प्रचंड साठ्यामुळे नायजेरिया हा आि्रकेतील एक महत्त्वाचा देश गणला जाताे. PM Modi visits Nigeria भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणारा देश म्हणूनही नायजेरियाची ख्याती आहे. ऊर्जा, खाणकाम, औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये आफ्रिकेतील भारतीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. मुत्सद्देगिरी आणि आर्थिक धाेरणासाठी महत्त्वाच्या असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज आणि ऑर्गनायझेशन ऑफ ऑईल प्राेड्युसिंग कंट्रीजचा हा देश सदस्य आहे. नायजेरिया हा भारताचा आफ्रिकेतील सर्वात माेठा व्यावसायिक भागीदार आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमाेहन सिंग यांच्यानंतर या देशाला भेट देणारे नरेंद्र माेदी हे चाैथे भारतीय पंतप्रधान आहेत. भारताने आफ्रिकन देशांच्या स्वातंत्र्याचे जाेरदार समर्थन केले आहे. नायजेरियाच्या स्वातंत्र्यापूर्वीच दाेन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचा शुभारंभ झाला हाेता. भारत हा जगातील सर्वात माेठा लाेकशाही देश असून नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात माेठा लाेकशाही देश आहे.
PM Modi visits Nigeria नायजेरियाची लाेकसंख्या २३ काेटी असून वेगाने विकसित हाेणाèया देशांपैकी याचा समावेश हाेताे. उभय देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेल्या विविध करारांमुळे विकासाचा एक नवा मार्ग खुला झाला आहे. पंतप्रधान माेदी आणि राष्ट्रपती बाेला अहमद टिनुबू यांच्यातील चर्चेत भारत-नायजेरिया धाेरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला गेला. उभय नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षेच्या मुद्यांवरही चर्चा केली. नायजेरियाला गिनीच्या आखातामध्ये महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागत आहे, जिथे चाचेगिरी ही एक प्रमुख चिंता आहे. भारताने नायजेरियाच्या डिजिटल परिवर्तनासाठी, विशेषत: माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आराेग्य सेवा व्यावसायिकांसाठी औषधांचा पुरवठा आणि क्षमता-निर्माण यासह आराेग्य सेवेमध्ये नायजेरियाला मदत करण्याची भारताने इच्छा व्यक्त केली. PM Modi visits Nigeria उभय देशांमध्ये विद्यार्थी आणि शैक्षणिक देवाणघेवाणीबाबत एकमत झाले असून त्यासंदर्भातील एका सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सांस्कृतिक देवाणघेवाणीबाबतच्या एका करारावरही या निमित्ताने हस्ताक्षर करण्यात आले. सीमा शुल्क प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी दाेन्ही देशांमधील व्यापार अधिक कार्यक्षम बनवण्याचा निर्णय या दाैऱ्यात झाला. सर्वेक्षण आणि भाैगाेलिक डेटा, पायाभूत सुविधांचा विकास आणि नियाेजन यामध्ये सहकार्य वाढविण्याचाही विचार झाला. PM Modi visits Nigeria नायजेरियातील भीषण पुराच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र माेदी मानवतावादी दृष्टिकाेनातून पूरग्रस्तांना २० टन धान्य पाठवणार आहेत. २०२२ भारत आणि नायजेरियादरम्यानचा व्यापार १५ अब्ज डाॅलर इतका हाेता. त्यात आता वाढ झालेली आहे.
नायजेरियाला भारताच्या प्रमुख निर्यातीत फार्मास्युटिकल्स, ऑटाेमाेबाईल्स, यंत्रसामग्री आणि रसायने यांचा समावेश हाेताे, तर नायजेरिया भारताला तेल आणि वायू उत्पादनांची निर्यात करताे. भारताने नायजेरियातील तेल आणि वायू क्षेत्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे. भारत नायजेरियामध्ये कृषी, उत्पादन आणि अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शाेधत आहे. PM Modi visits Nigeria या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आणण्यासाठी भारतीय कंपन्या सज्ज आहेत. भारताने नायजेरियाला १०० दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सचे सवलतीचे कर्ज महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांच्या उभारणीसाठी दिले आहे. नायजेरियन व्यावसायिकांना स्थानिक क्षमता निर्माण करण्यातही भारत मदत करणार आहे. नायजेरियात मराठी भाषकांची संख्याही माेठी आहे. त्यांना संबाेधित करताना माेदींनी मराठी लाेकांच्या हृदयाला हात घातला. मराठी भाषकांनी यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल माेदींचे काैतुक केले. जागतिक परिस्थितीत नायजेरियाचे महत्त्व वाढलेले आहे. तथापि, भारताच्या या दाैऱ्यांना पाकिस्तानची चुळबूळ वाढली आहे. पाकिस्तानी नेतृत्वाला माेदींचा हा दाैरा खुपत आहे. PM Modi visits Nigeria येत्या काळात विविध करारांच्या माध्यमातून नायजेरिया भारताच्या अधिक जवळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आणखी एका देशाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाेबतच माेदींनी जागतिक शांततेच्या दृष्टीने आणखी एक खंबीर पाऊल टाकले आहे.