जळगाव – दाखल गुन्ह्यातील संशयीताला अटक करू नये, यासाठी १५ हजाराची लाच घेतांना रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड या दोघांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यानुसार १५ हजार रूपये लाचेची रकम घेताना सावदा पो.स्टे.च्या एपीआय आणि पीएसआय या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. दिवाळीच्या धामधुमीनंतर लाचेचा पहिला बॉम्ब पोलीस विभागाने फोडला आहे.
सावदा शहरातील अपहार प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयितांना अटक करू नये, यासाठी सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी तक्रारदाराकडे ६० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराने एपीआय इंगोले आणि पीएसआय गायकवाड यांना १५ हजार रूपये देण्याचे कबूल केले. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार मंगळवार १ नोव्हेेंबर रोजी सकाळीच लाच लुचपत विभागाकडून लावलेल्या सापळयात सावदा पो.स्टे.चे एपीआय देवीदास इंगोले आणि पीएसआय समाधान गायकवाड या दोघांना तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्विकारतांन अलगद अडकले. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त पथकाकडून करण्यात आली.