---Advertisement---

विविध सामाजिक संस्थांतर्फे नागरिकांना मतदानाचे आवाहन

by team
---Advertisement---
जळगाव :  येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल , एसडी फाउंडेशन व इव्हेन्टस् , सॅटर्डे क्लब जळगाव चॅप्टर आणि भारत विकास परिषद , जळगाव शाखेतर्फे शहरातील विविध चौकात थांबून हातात  पोस्टर घेऊन नागरिकांना  मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले .
    यावेळी आकाशवाणी चौकात  रोटरी क्लब सेंट्रलचे प्रेसिडेंट कल्पेश शाह , सेक्रेटरी दिनेश थोरात, प्राचार्य गोकूळ महाजन , साधना दामले , शामलाल कुकरेजा तर स्वातंत्र चौकात सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी डॉ.दीपक पाटील , सुदर्शन चालसे , रोहन चौधरी , विनोद चौहाण उपस्थित होते. काव्यरत्नावली चौकात भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विशाल चोरडिया , डॉ. विकास चौधरी , प्रशांत महाजन , रवींद्र लढ्ढा , अतुल काबरा , जितेंद्र लाठी , उमेश पाटील उपस्थित होते.
  दरम्यान,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ज्या भागातून कमी मतदान होते तेथे मतदान करण्याविषयी जनजागृती करावी असे ही आवाहन केले होते , त्या अनुषंगाने हे जनजागृती अभियान राबविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment