जळगाव : सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. ७२/१९९८ दि.२७ सप्टेंबर, २००१ च्या अंतरिम आदेशानुसार दसरा, दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदूषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यास निर्बंध घालण्याबाबत अंतरिम आदेश दिलेले आहेत. केंद्र शासन, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य शासन यांनी भारत सरकारच्या राजपत्र क्र. जीएसआर/६८२/ई दि. ५ ऑक्टोंबर, १९९९ नुसार प्रकाशीत केलेल्या पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतूदींचे मुख्यत्वे करुन व नियमातील सुधारित नियम ८९ ची, जे फटाकच्या आवाजाच्या मानांकाबाबत आहेत त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
फटाक्यांचे दारुकाम किंवा फटाके सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधी व्यतिरिक्त उडविण्यास परवानगी देण्यात येऊ नये. तसेच रात्री १० ते सकाळी ६ वाजे पर्यंत दारुकाम व फटाके यांचा वापर करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये या फटाक्यांवर घातले निर्बंध एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मिटर अंतरापर्यंत १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. जर साखळी फटाक्यात एकूण पन्नास, ते शंभर ते त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मिटर अंतरापर्यंत अनुक्रमे १५०,११० व १०५ डेसीबल एवढी असावी व त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या तसेच १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांचे सभोवतालचे १०० मिटर पर्यंतचे क्षेत्र येते.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश
राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण संस्थाच्या व्यवस्थापक व मुख्यध्यापक यांना ध्वनी व हवा प्रदुषणाने अपायकारक
परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके / साखळी फटाके जप्त करुन त्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी.