जळगाव : येथे काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.हि बैठक महाराष्ट्राचे प्रभारी रामनाथ चेन्नीथला यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली. या बैठकीत नव मतदार नोंदणी, तसेच काँग्रेस पक्षाचे मागील सहा महिन्यातील आंदोलनांचा आढावा व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे उमेदवारी मागणीसाठी संदीप घोरपडेंसह अनेकांनी जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल केले.
बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील अनुचित घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून बीएलए यांच्या कार्यपद्धतीची दिशा ठरविण्यात आली. याचवेळी संपूर्ण जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना आपली मते मांडण्यास व उमेदवारी मिळविण्यासाठीचे अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले.
याप्रसंगी, जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व अमळनेर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक संदीप घोरपडे यांनी आपला अर्ज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, प्रदेश काँग्रेसचे बंटी भैया व पदाधिकारी पुढील प्रमाणे उपस्थित होते. यात अमजद पठाण, सुभाष देशमुख जाधव, रमेश पुंजु शिंपी, अशफ़ाक अहमद पटेल, मुफ्ती हारुन नदवि, संजीव बळीराम पाटील, डॉ. राठोड, के. डी. पाटील, हरीश पारुमल गवनानी, धनंजय हरीश चौधरी, डॉ. व्ही. डी. पाटील, फयाज हुसैन, रविंद्र निकम, अब्दुल हमीद शेख, भागवत केशव सुर्यवंशी, गजेंद्र दत्तात्रय साळुंखे, गोकुळ नामदेव बोरसे, ऍड. प्रविण नाना सुरवाडे, शेख सलीम हमिद, सखाराम मोरे, नितीन नेताजी सुर्यवंशी, दिनेश सोपानराव पाटील, ऍड. अमजद पठाण, गजानन देशमुख, अमोल देशमुख, हामिद मूसा कुरेशी, प्रा. मनोज देशमुख, मनोज चौधरी, अशफाक काझी आदी उपस्थित होते.