भारतीय नौदलात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नौदलाने अग्निवीर एसएसआर आणि अग्निवीर एमआर भरती ०२/२०२५ आणि ०२/२०२६ बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
अग्निवीर एमआर पदांसाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून हायस्कूल (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच एसएसआर पदांसाठी, बारावीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह संगणक विज्ञान / रसायनशास्त्र / जीवशास्त्र या विषयातून एक विषय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
०२/२०२५ बॅचसाठी: उमेदवारांचा जन्म ०१ सप्टेंबर २००४ ते २९ फेब्रुवारी २००८ दरम्यान असावा.
०१/२०२६ बॅचसाठी: उमेदवारांचा जन्म ०१ फेब्रुवारी २००५ ते ३१ जुलै २००८ दरम्यान असावा.
०२/२०२६ बॅचसाठी: उमेदवारांचा जन्म ०१ जुलै २००५ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान असावा.
अर्ज शुल्क
सर्व श्रेणीतील उमेदवारांना ५५० अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
असा करा अर्ज
१.अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जावे.
२. त्यानंतर उमेदवारांनी होम पेजवरील “अग्निवीर अर्ज उघडा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करावे.
३.आता नवीन नोंदणी करण्यासाठी “नोंदणी करा” वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
४. यानंतर, लॉग इन करा आणि विचारलेली इतर माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
५. त्यानंतर उमेदवारांनी विहित अर्ज शुल्क भरावे आणि फॉर्म सबमिट करावा.
६.आता उमेदवारांनी अर्जाचा प्रिंटआउट घ्यावा आणि भविष्यातील वापरासाठी तो जतन करावी.