महाराष्ट्रातील पोलीस भरतीबाबत अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या वेबसाईट सुरू नसल्यामुळे फॉर्म भरले जात नव्हते. शासकीय कागदपत्रे काढताना सुद्धा अडचणी येत होत्या आणि 30 नोव्हेंबरपर्यंतच मुदत असल्यामुळे अनेक तरुण पोलीस भरती पासून वंचित राहिले असते. त्याबाबत अनेक तरुणांनी ही व्यथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडली होती.
ना.गिरीश महाजन यांनी राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही समस्या मांडली व पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 28 नोव्हेंबर रोजी विनंती केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करून पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.