महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात  प्रदीप पाटील(जळगाव तालुका अध्यक्ष), देवेंद्र माळी (जळगाव तालुका उपाध्यक्ष),  मनोज लोहार जळगाव तालुका सचिव, विलास सोनार (जळगाव तालुका संघटक), हर्षल वाणी (जळगाव शहर सचिव),  शुभम महाजन (एरंडोल तालुका संघटक), देवानंद घुले (एरंडोल तालुका सचिव )यांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा, केळीला फळाचा दर्जा मिळावा, हमीभाव योग्य प्रमाणात मिळावा,शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी आमचा पक्ष काम करणार आहे, असे मार्गदर्शन राज्य सचिव अमोल भिसे यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष आशिष सपकाळे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहित कक्षाचे संदिप मांडोळे, निलेश खैरनार, कमलाकर पाटील दी पदाधिकारी उपस्थित होते.