जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर भानुदास येवलेकर, केदारनाथ कवडीवाले, नरेंद्र नारखेडे, केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, रामसिंग वळवी आणि मीनाक्षी निकम या आठ जणांचे नामनिर्देशन महाराष्ट्राचे कुलपती तथा राज्यपाल यांनी केले आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेले भानुदास येवलेकर हे केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प अधिकारी (प्रोजेक्ट्स) आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 अंतर्गत कलम 28 (2) (यू) अन्वये कुलपती हे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 10 व्यक्तींचे अधिसभेवर नामनिर्देशन करतात. राजभवनातून राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार यांच्या स्वाक्षरीचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर आठ जणांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यामध्ये केदारनाथ कवडीवाले (दोंडाईचा, जि. धुळे), भानुदास येवलेकर (जळगाव), नरेंद्र नारखेडे (फैजपूर, जि. जळगाव), केतन ढाके (जळगाव), जयंत उत्तरवार (नंदुरबार), नेहा जोशी (जळगाव), रामसिंग वळवी (मु. कंजाला, पो. भगदरी, ता. अक्कलकुव्वा, जि. नंदुरबार) आणि मीनाक्षी निकम (चाळीसगाव) यांचा समावेश आहे.