तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । दिल्लीत श्रद्धाची हत्या करणारा अबताफ सर्वांच्याच मनात चिड निर्माण करणारा ठरला. त्याच्या विरोधात देशभरात अद्यापही आंदोलने सुरू आहेत. त्याला फाशीची झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत असताना आणखी काही धक्कादायक प्रकार एकापाठोपाठ घडले. ‘लव्ह जिहाद’ विरोधात जनमत एकत्र येत असताना चार दिवसांपूर्वीचीच गोष्ट… शहरातील शिवकॉलनी भागात दिल्लीहून एक युवक आला.
जळगावातील दोन युवती व तो काही काळ या ठिकाणी एका खोलीत होते. हा प्रकार लक्षात येताच काही जणांनी त्यांना पोलीस स्टेशनला नेले… दरम्यान, त्यातील एका युवतीने तेथून काढता पाय घेतला… तो युवक व युवती दोघांना पोलीस स्टेशनला नेल्यावर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करावा, असा आग्रह धरला. तब्बल तीन ते चार तास या विषयावर खलबत सुरू होते. पोलीस स्टेशनप्रमुखाने संबंधित मुलीच्या पालकांशी चर्चा केली. यामागे कोणी होते का… अशी भूमिका का घ्यावी लागली… वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत हा विषय गेला की नाही… असे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. काही तासानंतर दोघांना समज देऊन सोडून देण्यात आले. किती हा धक्कादायक प्रकार… दोन दिवस या विषयावर चर्चा झाली… पण नंतर सारे काही शांत झाले. हा एक प्रकार समोर आला म्हणून ठिक पण असे प्रकार आता वारंवार घडत असल्याचे लक्षात येते. एक अल्पसंख्याक येतो… बहुसंख्य असलेल्या समाजातील मुलीला छेडतो… आणि पोलीस केवळ चर्चा व समज देऊन या मुलाला सोडून देतात, आहे की नाही धक्कादायक प्रकार… अशा अनेक घटना घडतात… काहींची उघड तर काहींची कानात चर्चा होते. विशेष म्हणजे काही राजकीय पदाधिकार्यांनी यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली, मात्र त्यांचेही समाधान केले गेले नाही. आता सार्यांना या प्रकाराचा विसर पडेल… अशी एक नाही वेगवेगळे प्रकार सर्रास सुरू आहेत. आता हेच बघा ना….काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आजही विद्यार्थिनींना बंधने असतात. टिकली लाऊ नका… बांगड्या घालू नका, असे सांगितले जाते.
पालकही म्हणतात… नको आपल्या पाल्याचे नुकसान करतील.. कशाला या भानगडीत पडायचे… नाही तर नाही… असा धाक वर्षानुवर्षे या शाळांमध्ये असतो… पालकवर्ग प्रवेशासाठी हजारो रुपये या शाळांना देतात… तरी हा धाक कायम असतो… तसेच याच शाळांमध्ये नाताळ साजरा होतो… शिक्षक हिंदू, विद्यार्थी हिंदू पण सण कोणता साजरा करतात… कारण पैसे मोजून ज्या शाळेत प्रवेश घेतला तेथील व्यवस्थापनातील पदाधिकारी ख्रिश्चन असतात… या व्यक्ती अल्पसंख्यक समाजाच्या म्हणून वर्षानुवर्षे असले प्रकार सुरू आहेत. आम्ही अल्पसंख्यक म्हणून मिरवून घेणार्यांची ही दादागिरी नेहमी सुरू असते. त्यामुळेच प्रश्न पडतोे आम्ही बहुसंख्य की अल्पसंख्य….!