---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील १८ पालिकांमधील सदस्यपदाच्या ४५२ जागांसाठी १५१४ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात ‘लॉक होणार आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.
६ पालिकांमधील १२ प्रभागांसाठी मंगळवारी मतदान होणार नसल्याने केवळ ४५२ जागांसाठीच ही प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे १२ प्रभागातील ४१ उमेदवार वळता १५१४ उमेदवारांच्या नावांचा मतपत्रिकेतर समावेश असणार आहे.
१८ पालिकांच्या सदस्यांसह अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली असून गतदान केंद्रे सज्ज आहेत.
मंत्री रक्षा खडसे अन् पोलिसांमध्ये बाचाबाची
मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडविले. यामुळे मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या असल्याचे बोलले जात आहे. परिणामी
शहरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.









