मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात आज दुपारी भारतीय हवाई दलाचे मिराज-2000 हे दोन आसनी लढाऊ विमान बहरेटा सानी गावाजवळील शेतात कोसळले. दुर्घटनेपूर्वी दोन्ही पायलट्सनी वेळेवर इजेक्ट केल्यामुळे ते सुरक्षित आहेत.
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली आणि यात हेलिकॉप्टर जळून खाक झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हेही वाचा : Dhule News: धामणगाव दुर्घटनेतील मयत पिता-पुत्राच्या वारसांना शासनाची आर्थिक मदत
विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच हवाई दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि पायलट्सना ग्वालियरला नेले. सध्या दुर्घटनेचे कारण समजू शकलेले नाही.
मध्य प्रदेशातल्या शिवपुरी इथल्या दबरासानी गावात हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर नागरी वस्तीपासून दूर नेलं. अन्यथा हेलिकॉप्टर घरांवर कोसळून अनर्थ झाला असता. हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यापूर्वी, 5 जानेवारी 2025 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाचे एक अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर नियमित प्रशिक्षणादरम्यान कोसळले होते, ज्यामध्ये तीन पायलट्सचा मृत्यू झाला होता. तसेच, नोव्हेंबर 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिग-29 विमान तांत्रिक अडचणींमुळे कोसळले होते, ज्यामध्ये पायलटने वेळेवर इजेक्ट करून आपला जीव वाचवला होता.