---Advertisement---

Jalgaon Water Scarcity : जळगाव जिल्हयातील सुमारे ५६२ गावांत पाणीटंचाईच्या झळांची भीती

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवरून पुढे पुढे सरकत आहे. या सप्ताहाच्या अखेरीस तापमान काहीसे कमी होऊन ४० अंशापर्यंत खाली येईल. परंतु सोमवारनंतर पुन्हा तापमान उसळी घेत ४५ ते ४७ अंशावर चढतच राहणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात गिरणा, हतनूर आणि वाघूर असे तीन मोठे आणि मध्यम व लघु असे ९६ प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांत सरासरी ४३.७७ टक्के उपयुक्त जलसाठा असून वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडेपाचशेच्यावर गावांमध्ये पाणीटंचाईचे (Jalgaon Water Scarcity) संकट जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी मे आणि जून महिन्यात पाणीटंचाई जाणवणाऱ्या ५६२ गावांसाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

प्रकल्पात ४३.७७ टक्के उपयुक्त जलसाठा

जिल्ह्यात ९६ लघु-मध्यम आणि ३ मोठे असे ९६ प्रकल्प असून असून गिरणा- ३१.०५, हतनूर- ५४.५१, वाघूर- ७८.९६ असा सरासरी ४७.४७ टक्के जलसाठा आहे. बोरी- १७.१५, भोकरबारी- ४.४५. अग्नावती- २९.६३, हिवरा- २५.२९, बहुळा- ३६.५०, अंजनी- ३४.१९, शेळगाव- २२.९४, मन्याड ३६.५५, तोंडापूर- ३६.१०, आदी लघु व मध्यम प्रकल्पात ४३.७७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर प्रमुख तीन मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा ४७.४७ टक्के असून एकूण ९६ सिंचन प्रकल्पात फक्त ४३.७७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

जळगाव शहराला पाणीटंचाईची शक्यता कमीच

जळगाव शहरासह अन्य नजीकच्या ग्रामीण परिसराला वाघूर प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. वाघूर प्रकल्पात आजमितीस ७९ टक्के जलसाठा असल्याने जळगाव शहरवासियांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जाण्याची शक्यता कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी ७७.२० कोर्टीचा आराखडा

२०२३-२४ दरम्यान अल्प मॉन्सूनमुळे गतवर्षी १०८ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. यात टंचाई निवारणासाठी प्रशासनाने १३८ टँकरसह १६६ गावांसाठी १९१ विहिरींचे अधिग्रहण केले होते. तर या वर्षी पाणीटंचाई निवारणासाठी सुमारे ७७.२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने, या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

टँकरचे प्रस्ताव स्थानिक स्तरावर

पाणीटंचाई निवारणासाठी टँकर प्रस्तावांना स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी यांच्या स्तरावर मंजुरी देण्यात येते. संभाव्य पाणीटंचाई आराखडा ऑक्टोबर अखेर तयार करण्यात येतो व त्यानुसार प्रत्यक्ष खर्च झाल्यानुसार तेवढ्याच रकमेचे अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर केला जात असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन प्रक्रिया जलद

गेल्या वर्षी मॉन्सूनदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे गिरणा, हतनूर आणि वाघूर ही प्रमुख धरणे भरली होती. जिल्ह्याच्या पूर्व भागात जलसाठा बऱ्यापैकी असला तरी सध्याच्या वाढत्या तापमानामुळे जलाशयांमध्ये बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होत असल्यामुळे पश्चिम भागातील गिरणा, बहुळा, अंजनी आदी प्रकल्पसाठ्यांची जलस्थिती मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे.

गिरणा प्रकल्पावर शहरी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा अवलंबून

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्पांवर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगावसह अन्य दहा नगरपालिका, मालेगाव महापालिका तसेच १७४ गावे आणि १३० पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत देण्यात आलेल्या आवर्तनामुळे आणि दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे गिरणा प्रकल्पात आजमितीस केवळ ३१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

संभाव्य गावांसाठी पाणीटंचाई आराखडा

जिल्ह्यात सद्यस्थितीत अजून कोणत्याही गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली नाही. टँकरची मागणीदेखील करण्यात आलेली नाही. गत वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ टँकर सुरू करण्यात आलेल्या गावांची आकडेवारी व परिस्थिती पाहता या वर्षी संभाव्य गावांसाठी पाणीटंचाई कृती आराखडा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

  • आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment