सातपुडा जंगलातील आंबापाणी केंद्रावर जाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था 

जळगाव :  जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातील आंबापाणी हे सातपुडयातील जंगलात येणारे मतदान केंद्र आहे.  या मतदान केंद्रावर ३८४ मतदार आहेत. दुर्गम भागात असणाऱ्या या मतदान केंद्रांवरील मतदाते मतदानापासून वंचित राहू नये याची प्रशासनाकडून याची काळजी घेतली जात आहे.

या पाड्यावरील मतदान केंद्रावर आठ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मंगळवार ,  १९  रोजी एक क्रूझर जीप आणि वन विभागाच्या गाडीसह ही टीम जाण्यासाठी निघाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोटारसायकल वर ही टीम गेली होती.  यावेळी या दोन वाहनातून चोपडा ते न्हावी, तिड्या, मोहमांडली, रुईखेडा मार्गे आंबापाणी असे 70 किलोमीटरचे अंतर पार करून ही टीम केंद्रावर पोहचणार आहे