पुण्यात दहशतवादी कट उधळला, वाचा सविस्तर!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर मध्ये दहशतवादी  कारवाया सुरूच आहे.काश्मीर मध्ये या दहशदतवादी कारवाई हाणून पाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे .पण आता पुण्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. हे दोन्ही दहशवादी पुण्यात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. ते मोठा बॉम्बस्फोट करणार होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या चौकशीत पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा कट हा उधळला गेला आहे. पुणे पोलिसांनी सोमवारी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. हे दहशतवादी दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होते. तपास यंत्रणा त्यांच्या फरार असलेल्या तिसर्‍या साथीदाराचा शोध घेत आहेत.

पुणे पोलिसांनी सोमवारी गस्तीवर असताना मोहम्मद युनुस आणि मोहम्मद इम्रान या दोघांना भुरटे चोर म्हणून मध्यरात्री अटक केली होती. हे भुरटे चोर नसून, दशतवादी असल्याचे तपसात पुढे आले होते. त्यांचा म्होरक्या मोहम्मद आलम हा अंधाराच्या फायदा घेत पसार झाला होता. या दहशतवाद्यांनी राजस्थानमध्ये बॉम्ब स्फोट घडवला होता. हे दोघे साकी आणि खान इसिस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना सुफाशी संबधित असल्याचे तपासात आढळले होते. दीड वर्षांपासून ते फरार होते. एनआयएने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीसदेखील ठेवले होते.