जळगाव : अक्कलकोट नगरीतील श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी-पादुकांचे आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता जळगाव शहरात आगमन झाले. स्वामी समर्थांच्या नाम गजरात पालखी पांडे डेअरी चौकाजवळील रामदेवबाबा मंदिर येथून गणेशवाडीतील शिरसाळे परिवाराच्या निवास्थानी दाखल झाली. यावेळी ट्रस्टचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पूजा अभिषेक व महाआरती करण्यात आली.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोटतर्फे अक्कलकोट तीर्थस्थळी बांधण्यात येत असलेल्या महाप्रसादालय व नवीन भक्त निवासाच्या बांधकामास निधी उपलब्ध व्हावा या उद्धेशातून पालखी परिक्रमा आयोजित करण्यात येते. गेल्या २८ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्याच्या काही भागात तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेपर्यंत गावोगावी, शहरातून नेली जाते. पालखी परिक्रमेचा मुख्य उद्देश म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना दर्शनासाठी अक्कलकोट येता नाही त्यांना दर्शन व्हावे, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी असल्याचे मत पुरोहित संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सालाबादाप्रमाणे यंदाही जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी-पादुकांचे आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता जळगाव शहरात आगमन झाले. स्वामी समर्थांच्या नाम गजरात पांडे डेअरी चौकातून गणेशवाडीतील शिरसाळे परिवाराच्या निवास्थानी पालखी दाखल झाली. यावेळी ट्रस्टचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पूजा अभिषेक व महाआरती करण्यात आली.
दरम्यान, शहरात पालखी सोहळ्याचे हे १९ वे वर्ष असल्याची माहिती सुखदेव शिरसाळे यांनी दिली तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.