जळगाव – गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, रांगोळी आदी अनेक कलांच्या “रामरंगी” प्रस्तुतीने झालेल्या जल्लोषात ७५ वर संस्कार भारतीच्या कला साधकांनी आजपासून सुरू होत असलेल्या मराठी नव वर्षाची गुढी पुजून स्वागत केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, रांगोळी आदी कला प्रकार कलावंत सादर करत होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्वागत सत्कारानंतर अध्यक्ष डॉ. सुभाष महाले यांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली. सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले. ‘साधयति संस्कार भारती’ या ध्येय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली; त्यावर कथक कला मंदिरच्या विद्यार्थिनीनी सुंदर नृत्य रमा करजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. यानंतर याच विद्यार्थिनींनी भक्तीपूर्ण ‘श्रीरामचंद्र कृपालु भजमन’ ही राम वंदना नृत्यातून सादर केली.
संगीत विभागाच्या कला साधकांनी “राम्रराज्य पहा हो आहे गुढी उभी दारी’ हे नवंवर्ष स्वागत गीत सादर केले. शब्दरचना सुचेता नेवे यांची होती. यानंतर व्हायोलीन बासरी, संवादिनी व गायनातून मातृशक्तीच्या कला संगीत साधकांनी स्वरा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘”पायो जी मने राम रतन धन पायो” हे हिंदी भजन सुस्वरात सादर केले.
“नादातून या नाद निर्मितो” या सुप्रसिद्ध भजनावर शिवानी जोशी-पाठक यांच्या कथक नृत्यांगनानी लोभसवाणे नृत्य सादर केले. डॉ. विशाखा जोशी व रश्मी कुरमभट्टी यांनी कीर्तनातून शबरी, मातेने केलेली श्रीरामाची भक्ती विशद केली. त्यांना दिव्या ब दिलीप चौधरी यांनी तबला व संवादिनी साथ संगत केली. कीर्तनचा यानंतर ‘ध्यान लागले रामाचे’ या रचनेवर कथक नृत्य सादर झाले. हे नृत्य शिवानी जोशी यांच्या विद्यार्थिनी सादर केले. युवा नाट्यदिग्दर्शक अमोल ठाकुर व त्यांच्या बाल चमूने अतिशय भाव-भक्तिमय स्वरुपात श्रीराम शबरी भेटीवर आधुनिक काळाच्या अनुसार भक्तीचा संस्कार दर्शविला. रमा करजगावक यांच्या कथक कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी “त्रिवार जयजयकार रामा” या गीतरामायणातील भैरवीवर सादर केलेल्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमाची
सांगता झाला.
जळगाव संस्कार भारतीच्या आजवर झालेल्या सादरीकरणांचा हा कळसाचा कार्यक्रम ठरला. कारण यात ७५च्या वर कला साधक सहभागी झाले होते. चित्रकलेसह शिल्पकला तसेच कीर्तनकलेचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून नारदीय कीर्तन परंपरेतील महिलां कीर्तनकारांनी पूर्वरंग व उत्तर रंग मांडून कीर्तन रंगविण्याला हा पहिलाच प्रयोग ठरला. तसच मचावर कला प्रस्तुती होत असताना साबण शिल्पकाम करणारे अरुण पाटील किंवा चित्रकार निखिल बोरसे व सचिन मुसळे यासह लाइव्ह कला साधना प्रस्तुती हे. कार्यक्रमाचे वैशिष्टय ठरले. ५-६ वर्षाच्या बाल कलाकारापासून सत्तरीच्या वयातल्या कलाकारापर्यंत सर्वांनी या रामरंगी पाडवा कार्यक्रमाची रगत, वाढवली. निवेदन हर्षा पाठक यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला आघाडी प्रदेशउपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, उद्योजक कांतीलाल कोठारी उपस्थित होते. यशस्वी आयोजनासाठी दुष्यंत जोशी, फडणवीस सर, महाले सर, दिलीप चौधरी, निळकंठ कासार, अनिल पाटील, रमा करजगावकर, विशाखा देशमुख, सुचेता नेवे, अनिता निवाने, राजश्री धर्माधिकारी, स्वाती देशमुख, मंदा वाणी, सविता पारमार्थि, आसावरी, गीता रावतोले, रावतोळे सर, दिलीप पाटील, चंद्रात्रे, गौरव मेहता, प्रमोद जोशी, संपदा चांदोरकर, शरदचंद्र छापेकर, मोहन रावतोळे, पुरुषोत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, आशा जोशी, भागवत पाटील, ज्योती पाटील, भूषण खैरनार, चिंतामणी पाटील, विशाखा जोशी, रश्मी कुरमभट्टी, मिलिंद देशमुख, पियुष रावळ, वैदेही नाखरे आदींनी मेहनत घेतली. यावेळी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.