कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेला नेता! ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. जम्मू-काश्मीर राज्यात ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेला नेता, अशीही त्यांची ओळख आहे. वारंवार काश्मीरमध्ये अशांतता पसरविण्याची भाषा करणाऱ्यांच्या रांगेत ओमर अब्दुल्ला यांचेही नाव आहे.

आमची केंद्रात सत्ता आली तर काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा प्रस्थापित करू, असे आश्वासनच त्यांनी यापूर्वी देऊन टाकले होते. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमावर टीकाही झाली. यावेळी जम्मू काश्मीरा येथे विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने एकूण ४८ जागांवर विजय मिळवला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले होते. आता सरकार स्थापन झाले आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा शपथविधी सोहळा झाला.

यादरम्यान, २००९ ते २०१५ पर्यंत ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होते. आता पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात आले आहे. मात्र यामुळे कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे मनसुबे या सरकारच्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, पीडीपी यांसारख्या पक्षांकडून राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात जम्मू व काश्मीरचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.