ईटानगर : देशात एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात पक्ष बदलाचा खेळ सातत्याने सुरू आहे.अरुणाचल प्रदेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने विरोधकांना जोरदार दणका दिला आहे. रविवारी काँग्रेस आणि एनपीपी पक्षाच्या प्रत्येकी दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
बहुजन समाज पार्टीच्या उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधील खासदार रितेश पांडे यांनी रविवारी बसपचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.याचप्रमाने अरुणाचल प्रदेशमध्ये एक मोठा बदल झाला असून 2 काँग्रेस आमदारांसह एनपीपीच्याही २आमदारांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये सामील झाले आहेत. पक्ष बदलणाऱ्यांमध्ये एका माजी केंद्रीय मंत्र्याचाही समावेश आहे.
अरुणाचल प्रदेशातील आगामी निवडणुकांपूर्वी सत्ताधारी भाजपला बळकटी देण्यासाठी काँग्रेसचे 2 आमदार आणि 2 नॅशनल पीपल्स पार्टी आमदारांनी रविवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 4 आमदारांच्या पक्षांतरामुळे विधानसभेत दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या घटली आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेस आणि एनपीपी या दोन्ही पक्षांकडे आता २-२ आमदार आहेत. तर भाजपकडे ५६ आमदारांचा संख्याबळ आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री निनॉन्ग एरिंग आणि वांगलिन लोवांगडोंग यांच्यासह एनपीपीचे मुचू मिठी आणि गोकर बसर यांनी इटानगर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि भाजप प्रदेश अध्यक्ष बिउराम वाहगे उपस्थित होते.