अरूणभाई गुजराथी यांची तीन मजली जुनी इमारत जमीनदोस्त

by team

---Advertisement---

 

चोपडा : तालुक्यात मागील आठ दिवसापासून पावसाने जोर धरला असून भिज पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान होतांना दिसत आहे. त्यातच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ही तीन मजली जुनी इमारत सोमवार ५ च्या रात्री सुमारे २ ते ३ वाजेच्या सुमारास कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली आणि .

अरुणभाई गुजराथी यांच्या मालकीची इमारत सुमारे ७० ते ८० वर्ष जुनी आहे. या इमारतीत कोणाचेही वास्तव्य नाही . अरूणभाई गुजराथी हे त्यांच्या कुटुंबियांसह नव्या इमारतीमध्ये मागील बाजूला राहतात.  गुजराथी गल्लीतील महादेवाच्या मंदिरासमोर ही तीन मजली जुनी इमारत असून यातील काही भाग रात्री पावसाने जमीनदोस्त झाला आहे. दिवसा जर ही घटना घडली असती  मोठा अनर्थ घडला असता.  श्रावण सोमवारनिमित्ताने  महादेव  मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती . या जीर्ण  इमारतीजवळ जुना ओटा आहे . दिवसा या ओट्यावर नेहमीच गर्दी असते. परंतु , घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळपासून सदरील घटना बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---