अरविंद केजरीवाल यांच्यावर दहशतवादी संघटनेकडून निधी घेतल्याचा आरोप ; NIA तपासाची शिफारस

 दिल्ली: दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात NIA तपासाची शिफारस केली आहे. त्याला ‘शिख फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेने आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. उपराज्यपाल यांच्याकडून मिळालेल्या तक्रारीनुसार,अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला या दहशतवादी संघटनेकडून 16 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले. देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी आणि खलिस्तानी विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी ही रक्कम मिळाली होती.

या तक्रारीवरूनउपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गृह मंत्रालयाकडे केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए तपासाची मागणी केली आहे. उपराज्यपाल यांनी जानेवारी 2014 मध्ये केजरीवाल यांनी इक्बाल सिंग यांना लिहिलेल्या पत्राचाही उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे की, आम आदमी पार्टी प्रथम भुल्लरच्या सुटकेची शिफारस करेल. त्यानंतर एसआयटी स्थापनेसह इतर मुद्द्यांवर काम केले जाईल. भुल्लरच्या सुटकेसाठी इक्बाल सिंग जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते. केजरीवाल यांचे पत्र मिळाल्यानंतर उपोषण संपवण्यात आले. या प्रकरणी दहशतवादी पन्नूच्या एका व्हिडिओचा हवाला देण्यात आला आहे. ज्यामध्ये 2014 ते 2022 दरम्यान अरविंद केजरीवाल यांना खलिस्तानी गटांकडून 16 दशलक्ष डॉलर्स मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वर्ल्ड हिंदू ऑर्गनायझेशन-इंडियाचे राष्ट्रीय महासचिव आशु मोंगिया यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार केली आहे. आम आदमी राजकीय पक्षाला मिळालेल्या पैशांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या तपासाची शिफारस करताना एलजीने म्हटले आहे की, तक्रारदाराने एका व्हिडिओचा उल्लेख केला आहे, जो गुरपतवंत सिंग पन्नू (खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा संस्थापक) यांचा आहे.