दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती स्वरकांता शर्मा यांच्य न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
निर्णय वाचताना न्यायाधीश म्हणाले की, हा अर्ज जामिनासाठी नसून केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने म्हटले आहे की, ईडीने गोळा केलेल्या पुराव्यांवरून अरविंद केजरीवाल यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून येते. केजरीवाल यांनी लाचखोरी प्रकरणात सक्रिय भूमिका बजावल्याचे पुराव्यावरून दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविले.