---Advertisement---

Delhi Election 2025 Result : दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जनतेने जो निर्णय..”

by team
---Advertisement---

Delhi Election 2025 Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) २७ वर्षांनंतर सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पार्टी (आप) २२ जागांवर मर्यादित राहिली. काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.

आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाचे प्रवेश वर्मा यांच्याकडून पराभूत झाले.

या पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी एक्स (ट्विटर) या समाज माध्यमावर पोस्ट करत जनतेच्या निर्णयाचा आदर केला आहे. ते म्हणाले, “जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही हा पराभव स्वीकार करतो. जनतेचा निर्णय सर्वोतोपरी आहे.” तसेच, त्यांनी भाजपाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि अपेक्षा व्यक्त केली की, भाजप सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल.

केजरीवाल यांनी पुढे म्हटले की, “गेल्या १० वर्षांत आम्ही शिक्षण, पाणी, रोजगार अशा विविध क्षेत्रांत बरीच कामे केली आहेत. आता जनतेने जो निर्णय दिला आहे, त्यानंतर आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याचा प्रयत्न करू. जनतेची सेवा करत राहू. राजकारणात आम्ही सत्तेसाठी आलेलो नाही. राजकारण आमच्यासाठी समाजसेवेचं साधन आहे.”

या निवडणुकीत भाजपाच्या विजयामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे, आणि आगामी काळात या बदलांचे परिणाम दिसून येतील.

अरविंद केजरीवाल यानं पराभूत करणारे  प्रवेश वर्मा कोण आहेत ?

प्रवेश साहेब सिंह वर्मा भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आहेत. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९७७ रोजी दिल्ली येथे झाला. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. प्रवेश वर्मा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

२०१३ मध्ये त्यांनी महरौली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे योगानंद शास्त्री यांना पराभूत केले. त्यानंतर, २०१४ आणि २०१९ मध्ये ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले.

१ सप्टेंबर २०१४ पासून ते नगरविकास स्थायी समितीचे सदस्य आहेत. १ सप्टेंबर २०१४ पासून ते संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांवरील संयुक्त समिती आणि शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment