Dada Bhuse Bharat Gogawale : महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा गोंधळ देखील झाला. परंतु या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या. १९ जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली.
पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. महायुतीतील वादामुळे तात्काळ राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली.
पालकमंत्रिपदावरून डावलल्याच्या चर्चांवर दादा भुसेंची प्रतिक्रिया दिलीये. पालकमंत्रिपदावरून डावललेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधी चर्चा केली होती. अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिलीये. तर पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणं हे कार्यकर्त्यांचं काम असल्याचंही त्यांनी म्हटलंय..
महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आलंय.. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय.. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आलीये.. भरत गोगावले आणि दादा भूसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीये.. तर हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा निर्णय आहे.. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय..