पाचोरा : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) शकील शेख यांनी 15 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आज 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी प्रमुख उपस्थित होते.
एएसआय शकील शेख यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे. पाचोरा उपविभागात त्यांनी उत्कृष्ट तपास, कायदा व सुव्यवस्थेचे पालन आणि नागरिकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधत पोलीस दलाचे कार्य उजळवले आहे.
त्यांच्या सेवेमुळे स्थानिक पातळीवर पोलीस प्रशासनाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शकील शेख यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.