चाळीसगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसतशी इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीला गती येत आहे. विविध गावांमध्ये तसेच शहरातील प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्याऱ्यांच्या शर्यतीबरोबरच जुन्या मातब्बरांचा जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. एकाच पक्षात अनेक दावेदार असल्याने अंतर्गत गटबाजीमुळे वादही उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---Advertisement---
काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी समर्थकांसह घराघरात भेटी-गाठी सुरु केल्या आहेत. तर काहींनी सामाजिक कार्य आरोग्य तपासणी शिबिरे, वृद्धांना मदत असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तिकीट मिळावे म्हणून वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून आपले वर्चस्व सिद्ध करण्याची मोहीम सुरू केली आहे.
दुसरीकडे, काही पक्षांनी गुप्त सर्व्हे व कार्यकत्यांच्या सूचनांवर आधारित उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग सुरु केली आहे. विशेष म्हणजे, महिला आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये महिला कार्यकर्त्यांची चळवळ सामाजिक संघटनाही आता सक्रिय होत आहेत. सामाजिक समतेचा आवाज या नावाने काही ठिकाणी बाहरताना दिसत आहे. गट तयार झाले आहेत. पक्षांच्या आतील गट-तट, वर्चस्वाच्या चढाओढी आणि उमेदवारीसाठी सुरू असलेली चढाओढ हे सर्वच या निवडणुकीचं स्वरूप अधिकच रंजक बनवत आहे. तसेच राजकारणात नवा रंग भरेल, असे चित्र पाहण्यास मिळत आहे.