आसामात २३८ बनावट मोबाईल सिम कार्ड जप्त!

आसाम, गुवाहाटी :  पोलिसांनी एका मोबाईल रिपेअर्स व्यावसायिकाकडून सुमारे २३८  बनावट सिमकार्ड जप्त केले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्याची माहिती मोरीगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीरन वैश्य यांनी दिली. माहितीनुसार, जिल्हा पोलिसांनी विविध ठाण्यांतर्गत सायबर गुन्हेगारांवर धाडसत्र सुरू केले आहे. विशेष पथकाने शनिवारी अमिनुल हक याच्या गोरोइमारी भागातील दुकानावर छापेमारी करत २३८  बनावट सिम कार्ड जप्त केले. या सर्व कार्डांचा विविध गुन्ह्यांत वापर केल्याचे आढळून आले आहे. कारवाईनंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी याआधी सुद्धा जिल्ह्याच्या विविध भागांत धाडसत्र राबविले होते. यावेळी तब्बल चार हजारांपेक्षा अधिक सिम कार्ड जप्त केले. अधिक तपासणीत सर्व कार्डांचा गुन्ह्यांमध्ये वापर केला होता. याशिवाय मोबाईल कंपनीचा वितरक आणि एका विक्रेत्याला अटक केली होती

आसाम पोलिसांना ही माहिती त्यांच्या खबरी कडून देण्यांत आली. व पोलिसांनी गुन्हेगारीनचा शोध घेऊन कार्यवाही करण्यात आली.