Assembly Election 2024 : हिना गावित अक्कलकुवा मतदारसंघातून लढणार ; उमेदवारी अर्ज केला दाखल

नंदुरबार : महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, महायुती व महा विकास आघाडी या दोन्ही आघाडींमध्ये विविध मतदार संघांमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यात महायुतीत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघांतील वाद कायम आहे. अशा वेळी भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी देखील या मतदार संघात उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डॉ. हिना गावित ह्या विधान सभेसाठी उमेदवारी अर्ज करण्याबाबत ठाम असल्या तरी पक्षातर्फे अद्यापही त्यांना एबी फॉर्म मिळेलेला नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी निश्चित करण्याबाबत सर्वच पक्षांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा- अक्राणी या मतदारसंघात तिढा आहे. महायुतीत अक्कलकुवा- अक्राणीची जागा हि शिवसेना शिंदे गटाच्या वाटेल आलेली आहे. यानुसार या मतदार संघांत आमदार आमश्या पाडवी याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार हिना गावित या देखील उमेदवारीसाठी ठाम आहेत. यामुळेच हिना गावितांकडून अक्कलकुवा मतदार संघातून एक अपक्ष व एक भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर त्यांचे वडील मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदूरबारमधून उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. 

महायुतीत अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे यांच्याकडे आलेली आहे. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आमश्या पाडवी यांना संधी देण्यात आलेली आहे. हिना गावित यांनी आमश्या पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान,  उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. उद्यापर्यंत या जागा वाटपात बदल होवून ही जागा भाजपला सुटेल असा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.