पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा उमेदवाराचे नावं जाहीर केले आहे. त्यांनी पार्वती मतदारसंघातून सचिन तावरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सचिन तावरे यांनी पुण्यातील पर्वती मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना संविधानाचा मान राखत आणि “एक मराठा, लाख मराठा” च्या जयघोषासह शक्ती प्रदर्शन केले.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वखाली मराठा समाज लढा देत आहे. मराठा समाजासाठी त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिला आहे. मराठा समाजासाठी सचिन तावरे यांच्या उमेदवारी पर्वती मतदारसंघात नवी संधी प्राप्त झाली आहे. सचिन तावरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुने कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पक्षाचे २००९ पासून पार्वती मतदारसंघ वर्चस्व आहे. भाजपने विद्यामान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पार्वतीत एक लाख ३० हजार मराठा मतदार असून मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व दिसून येत आहे. मराठा समाजाच्या प्राबल्यामुळे तावरे यांनी माधुरी मिसाळ यांना मोठे आव्हान उभे केले आहे. तावरे यांनी पर्वतीचा विकास हाच त्यांच्यासाठी मूळ मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.
सचिन तावरे यांच्या उमेदवारीच्या रुपाने मराठा समाजाला सशक्त प्रतिनिधित्व लाभणार आहे. पर्वतीत मराठा शक्तीचे एक नवे पर्व उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व आणि तावरे यांचा उमेदवारीचा मराठा समाजावर साकारात्कम परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील व सचिन तावरे हे भारतीय जनता पक्षाचे आव्हान कशा प्रकांरे पेलणार आहेत हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
तावरे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे पर्वतीमध्ये दोन सभा घेणार आहेत. बिबेवाडी आणि हिंगणे परिसरात या सभा होणार असून, या सभांमध्ये जरांगे तावरे यांच्या प्रचारासाठी व मराठा समाजाच्या हक्कांसाठी मतदारांशी संवाद साधतील.