Assembly Election 2024 : प्रभू श्रीराम मंदिरात नारळ वाढवून आ. भोळे करणार प्रचाराचा शुभारंभ !

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होत आहे. २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच जळगाव मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार आ. सुरेश भोळे हे मंगळवार ५ नोव्हेंबर पासून प्रचार दौऱ्याचा शुभारंभ करत आहे. ते प्रभू श्रीराम मंदिरातात प्रचाराचा नारळ वाढविणार आहेत.

आ. सुरेश भोळे हे सलग दोन वेळेस जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. ते तिसऱ्यांदा मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी करत आहेत. महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांनी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून नागरिकांची भेट घेऊन त्यांचा आशीर्ववाद घेत आहेत. दरम्यान, ते आपल्या प्रचाराची अधिकृतपणे सुरवात मंगळवार, ५ नोव्हेंबरपासून जळगाव नगरीचे ग्रामदैवत जुने जळगाव येथील प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

आ . सुरेश भोळे यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात सकाळी ७.३० वाजता प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून व दर्शन घेऊन होणार आहे. मंगळवारी मंडळ २ प्रभाग क्र. ३, ४, ५ येथे प्रचार करण्यात येणार आहे. या प्रचार दौऱ्याचा मार्ग ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिर, बौद्ध विहार, चौधरी वाडा , बदाम गल्ली, पांझरापोळ चौक, अवधूत व्यायाम शाळा, विठ्ठल पेठ, भावसार मढी, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, सराफ बाजार, दक्षणिमुखी हनुमान मंदिर, चौबे शाळा असा असणार आहे. या प्रचार दौऱ्याचा समारोप दत्त मंदिर दाणा बाजार येथे करण्यात येणार आहे.

आमदार सुरेश भोळे यांच्या प्रचार दौऱ्यात महायुतीचे शिवसेना, राष्ट्रवादी यासह इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.