पाचोरा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन घेण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व मतदारांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन पहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.
पाचोरा विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत भारत निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आले आहे. याकरिता स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तहसिलदार कार्यालय पाचोरा व भडगांव येथे (EDC) मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गावांत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह प्रचार प्रसिध्दी कामी वाहन येणार असून आपण सर्व मतदार बांधवांनी सदर जनजागृती वाहनाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून आपण प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन पहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.