बहिणीच्या आव्हानामुळे पाचोर्‍यातील ‘आप्पा’ दोन पावले मागे!

तरुण भारत लाईव्ह न्युज : पाचोरा विधानसभा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आमदार किशोर वाघ व माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात टोकाचे ‘राजकीय’ वैमनस्य. मात्र दूध संघ निवडणुकीत आमदारांनी माघात घेत दिलीप वाघ यांनाच जणू पाठिंबा दर्शविल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. भविष्यातील काही आव्हानांना तोेंड देण्यासाठी किशोरआप्पांची ही खेळी असल्याची भाकिते येथे वर्तविली जात आहेत.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक यंदा प्रथमच मोठी गाजत आहे. भाजप-बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विरूद्ध महाआघाडी अशा लढती दिसत आहेत. एकेकाळी राज्यात आपली ओळख निर्माण केलेला दूध संघ काही राजकीय धुरीणांच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रचंड तोट्यात येऊन बंद पडण्याची स्थिती होती. मात्र तत्कालिन युती सरकारने हा संघ एनडीडीबीच्या स्वाधीन केला. हळूहळू पुन्हा पूर्व स्थितीत संघ आला व निवडणुका घेतल्या गेल्या. त्यावेळी तत्कालिन मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल होऊन ही निवडणूक लढविली गेली होती. आताही तसे प्रयत्न झाले मात्र खडसे नकोत म्हणून हे प्रयत्न फसले.

बहिणीला शह देण्यासाठी खेळी

पाचोरा मतदारसंघात स्व. ओंकारआप्पा वाघ यांचे मोठे वर्चस्व होते. त्यानंतर स्व. आर.ओ. तात्या पाटील यांनी वाघांच्या गढीला शह दिला. उद्योजक म्हणून लौकिक असलेल्या आर.ओ. तात्या पाटील यांचे अकाली निधन झाले. मात्र त्यांनी पुतण्याला पुढे केले. आमदार किशोर पाटील पोलिसाची नोकरी सोडून शिवसेनेत आाले व आमदार झाले. मात्र दिलीप वाघ यांना राजकीय लढा देताना बर्‍याच वेळेस त्यांना नाकेनऊ येत होते. त्यातच आता चुलत बहीण म्हणजे आर. ओ. पाटील यांची कन्या जयश्री सूर्यवंशी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गाठून भावाला आव्हान दिले आहे. सद्य:स्थितीत पाचोर्‍याच्या राजकारणात त्या उजव्या ठरत आहेत. त्यांना प्रचंड सहानुभूती व पाठिंबा या मतदारसंघात मिळत आहे. परिणामी दोन पावले मागे येत किशोरआप्पांनी दिलीप वाघ यांना पाठिंबा दिला. दूध संघाच्या निवडणुकीत दिलीप वाघ हे बिनविरोध निवडून आले आहे. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना गटातून दिलीप वाघ हे बिनविरोध ठरल्याने पाचोरा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवडणुकीत प्रचंड चुरस

निवडणूक प्रचंड चुरस यंदा राजकीय नेत्यांनी ही निवडणूक मोठी चुरशीची केल्याचे दिसून येत आहे. सहकारातील या संस्थेवर आपलाच झेंडा असावा असे प्रयत्न दोन्ही गटांकडून दिसून येत आहे. अशी परिस्थिती असताना पाचोरा विधानसभा मतदार संघात चमत्कार घडला एका राजकीय नेत्यांनी म्हणजे आमदार किशोर पाटील यांनी चक्क त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी माजी आमदार यांनाच दूध संघातील संचालक मंडळात पाठविले .दिलीप वाघ हे युतीच्या गटात आले त्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या