जामनेर ः तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणीकडून ‘लिव्ह ॲण्ड रीरलेशनशीपच्या नोटरीवर जबरदस्ती सही घेत तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
संशयित मयूर देवद गोढरी याने 1 ते 3 सप्टेंबर तसेच 6 सप्टेंबरपासून 15 दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील त्याच्या घरी तू जर माझ्यासोबत पळून जावून लग्न कर, तू जर आली नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. तसेच पीडित तरुणीकडून ‘लिव्ह ॲण्ड रीलेशनशिप’च्या नोटरीवर सही घेऊन इच्छा नसताना तिच्यासोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी भादवि कलम 376 (2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.