नंदुरबारात गणेशाच्या विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला, एक जखमी

नंदुरबार :  शहरात श्री गणेशाच्या विसर्जनाला जाणाऱ्यांवर भाविकांवर पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी व रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात एकाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे.  या पाचही जणांविरोधात नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशा येथे श्री गणेशाच्या विसर्जनासाठी लकी दिपक चौधरी व त्यांचा मित्र तुषार भोई हे दोघे जात होते. यावेळी त्यांच्यावर नंदुरबार शहरातील कंजरवाडा जवळील रस्त्यावर चार-पाच जणांच्या टोळीने हल्ला केला. यात लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी लकी चौधरी यांच्या दोन्ही पायांवर, पाठीवर, पोटावर, हातावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तसेच त्यांनी जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. 

याबाबत  लकी दिपक चौधरी (वय २६, रा. सिध्दीविनायक मंदिराजवळ, मंगळ बाजार, नंदुरबार) याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  या फिर्यादीनुसार आकाश शिंदे, आकाश परदेशी, अक्षय मराठे, गिरु मराठे, विक्की मराठे, (सर्व रा. नंदुरबार) यांनी ही मारहाण केल्याचे नमूद आहे.   या पाचही जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील भाबड अधिक तपास करीत आहेत.