---Advertisement---
धुळे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर राहत्या घरात मुसळीने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना साक्री रोड परिसरातील राजीव गांधी नगरमध्ये घडली. या गंभीर घटनेनंतर पतीविरोधात धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीराबाई गोपाल पिवाल (वय ७५, रा. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, साक्री रोड परिसरातील राजीव गांधी नगरातील राहत्या घरात फिर्यादींची सून कोमल स्वयंपाकघरात काम करत असताना, तिचा पती देवेंद्र गोपाल पिवाल (वय ४१) याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत घरातील मुसळीने कोमलच्या डोक्यात जोरदार वार केले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
आरोपीने तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गंभीर घटनेनंतर धुळे शहर पोलिसात आरोपी पती देवेंद्र गोपाल पिवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.









