तरुण भारत लाईव्ह । २९ मार्च २०२३। विविध भागात रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या तांत्रिक कामांमुळे अनेक गाड्या रद्द केल्या जात आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लातोय. अशातच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ ते बादली या दरम्यान चौथ्या लाईनचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा ३० आणि ३१ मार्च असा २ दिवस ब्लॉक असणार आहे. यामुळे तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे.
आजपासून (ता. २९ मार्च) ते एक एप्रिल या कालावधीत मुंबई हावडा महामार्ग मार्गावरील अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, अमरावती सुरत एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेससह ३० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा वेग मर्यादित करण्यात आला आहे असे रेल्वेेने कळविले आहे.
या झाल्या गाड्या रद्द
अमरावती – पुणे एक्स्प्रेस – ३० मार्च
सुरत – अमरावती एक्स्प्रेस – ३० व ३१ मार्च
अमरावती – सुरत एक्स्प्रेस – ३१ मार्च व १ एप्रिल
अहमदाबाद – नागपूर एक्स्प्रेस – ३० मार्च
पुणे – नागपूर एक्स्प्रेस – ३० मार्च
नागपूर – पुणे एक्स्प्रेस – ३१ मार्च
भूसावळ – वर्धा एक्स्प्रेस – ३१ मार्च
वर्धा – भूसावळ एक्स्प्रेस – ३१ मार्च
गोंदिया – कोल्हापूर एक्स्प्रेस – ३१ मार्च