भुसावळ : भुसावळ विभागातील जळगाव-भादली स्थानकांदरम्यान (कि.मी. ४२३/१७-१९) चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या ५८ मीटर गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे महामार्गाच्या चौ पदरीकरण प्रकल्पांतर्गत (किमी ४२२.७०० ते किमी ५१०.००) अंतर्गत बांधला जात आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाइन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
२ रोजी या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे, गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सुरत विभागात मिनिटे, एक्सप्रेस ३० गाडी क्रमांक १२७४२ पटना-वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे ,गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने भुसावळ स्थानकातून सुटेल.
३ रोजी या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक २२१२२ लखनौ-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात एक तास १५ मिनिटे गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे, गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे, गाडी क्रमांक २२३११ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे तर गाडी क्रमांक ५९०७६ नंदुरबार पोजर आपल्या नियाजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने भुसावळ स्थानकातून सुटेल.
आज या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक १२५२० अगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ०१.१५ तास, गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिट गाडी क्रमांक १९०४६ छपरा-सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे तर गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने भुसावळ स्थानकातून सुटणार आहे.