मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ते आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते.
त्यांनी वसुची सासू, प्रियतम आणि तरुण तुर्क म्हातारे अर्क या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी विविध अभिनेत्यांसोबत काम केले आहे आणि सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोमध्ये देखील आपली कला दाखवली आहे. त्यांनी नवरा माझा नवसाचा, सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुड्डा आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अठसा उमटविला आहे. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात केली होती. त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात दमदार सुरुवात केली होती. त्यांच्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.