जळगाव: जामनेर येथे वाळूची अवैध वाहतूक करतांना जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जे वाहन मालक दंडाची रक्कम अद्याप जमा करू शकले नाहीत, त्यांच्या वाहनांचा लिलाव जामनेर तहसिल कार्यालयात २६ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
लिलावामध्ये भुषण जगन्नाथ वाघ, ज्ञानेश्वर दिनकर बाविस्कर, अरुण पंढरीनाथ नन्नवरे, आणि तस्लीम कदीर पटेल यांच्या डंपर, ट्रॅक्टर, आयशर या वाहनांचा समावेश असेल.
तसेच, जे लोक शासनास जमीन महसूलाची थकबाकी जमा न करता थांबवून ठेवलेली आहेत, अशा धर्मराज शशीकांत पाटील, अविनाश उर्फ पिंटु शंकर सोनवणे आणि हॉनेस्ट डेरीव्हीटीज प्रा.लि.चे डायरेक्टर राजरतन बाबुलाल अगरवाल यांच्या स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालयात होणार आहे.
या मालमत्तेचा लिलाव घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी १५ जानेवारी २०२५ रोजी सायं ५ वाजेपर्यंत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा, असे जामनेरचे तहसिलदार यांनी आवाहन केले आहे.