‘औरंगजेब अमर रहे’च्या घोषणा; किरीट सोमय्यांची कारवाईची मागणी!

बुलढाणा : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची नुकतीच मलकापूर, बुलढाणा येथे जाहीर सभा झाली. यात त्यांनी “औरंगजेब अमर रहे”च्या घोषणा दिल्या. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील कडासने यांच्याशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हणाले  किरीट सोमय्या?
औवेसी, काँग्रेस , उध्दव ठाकरे , राष्ट्रवादी फक्त मुस्लिम मतांसाठी औरंग्याचे उदात्तीकरण करत असल्याचा गंभीर आरोप केला असून शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंग्याला हीरो बनविण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई होणारच असे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.

व्हिडिओमध्ये लोक म्हणतात की…

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत औरंगजेबाचे नाव राहील. मात्र, ही घोषणाबाजी सुरू असताना ओवेसी या लोकांना हातवारे करताना दिसले. पोलिसांनी व्हिडिओचा तपास सुरू केला असून व्हिडिओ तपासून कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस उपनिरक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.