IND vs AUS, 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामान ऍडलेडमधील द ओव्हल स्टेडियमवर शुक्रवारपासून खेळला जात आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 87.3 षटकात 337 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांची फलंदाजी महत्त्वाची ठरली.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने त्यांची धावसंख्या एका विकेटवर 86 धावांवरून वाढवली. काही षटकांनंतर, जसप्रीत बुमराहने क्रीजवर बसलेल्या नॅथन मॅकस्विनीला 39 धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले कारण मॅकस्वीनीच्या काही वेळातच स्टीव्ह स्मिथ 2 धावा करून बाद झाला. दरम्यान, मार्नस लॅबुशेनने एका टोकाकडून 64 धावा केल्या.
ट्रॅव्हिस हेडने यावेळीही भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व राखले. एका टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या, पण हेडने पुढे जात चौकार-षटकार मारत ऑस्ट्रेलियाला भक्कम आघाडी मिळवून दिली. 99 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना हेडने 140 धावा केल्या. त्याला मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड केले. हेडचे कसोटी कारकिर्दीतील हे आठवे शतक होते.
या सामन्यात हेडने १४१ चेंडूत १४० धावांची खेळी केली, तर लॅबुशेनने १२६ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार)
यशस्वी जयस्वाल
केएल राहुल
शुबमन गिल
विराट कोहली
ऋषभ पंत (विकेटकीपर)
नितीश रेड्डी
रवीचंद्रन अश्विन
हर्षित राणा
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कॅप्टन)
उस्मान ख्वाजा
नॅथन मॅकस्वीनी
मार्नस लॅबुशेन
स्टीव्हन स्मिथ
ट्रॅव्हिस हेड
मिचेल मार्श
ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर)
मिचेल स्टार्क
नॅथन लियॉन
स्कॉट बोलँड