IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाचा दबदबा! दिवसाचा खेळ संपेपर्यंत निम्मा भारतीय संघ परतला तंबूत

#image_title

IND vs AUS, 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामान ऍडलेडमधील द ओव्हल स्टेडियमवर शुक्रवारपासून खेळला जात आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 87.3 षटकात 337 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 157 धावांची आघाडी घेतली होती.

ऑस्ट्रेलियाच्या 157 धावांच्या लक्षचा पाठलाग करतांना भारतीय संघ बॅकफूटवर दिसत आहे. १ ५ ७ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून शस्वी जैस्वाल 31 चेंडूत 24 धावा करून आऊट झाला. दुसरीकडे, केएल राहुलने 64 चेंडूत 37 धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्माला 23 चेंडूत केवळ 3 धावा करता आल्या. केएल राहुलला 10 चेंडूत केवळ 7 धावा करत बाद झाला.त्यामुळे दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 24 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत.

त्यामुळे, एडिलेडवर दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवासाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. एडिलेडवर खेळवण्यात येत असलेल्या या डे नाईट सामन्यात ऑस्ट्रेलियाने घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडिया या सामन्यात अज्याप 29 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या 157 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 24 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. तर पंत-नितीश रेड्डी ही जोडी नाबाद परतली आहे.

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार)
यशस्वी जयस्वाल
केएल राहुल
शुबमन गिल
विराट कोहली
ऋषभ पंत (विकेटकीपर)
नितीश रेड्डी
रवीचंद्रन अश्विन
हर्षित राणा
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कॅप्टन)
उस्मान ख्वाजा
नॅथन मॅकस्वीनी
मार्नस लॅबुशेन
स्टीव्हन स्मिथ
ट्रॅव्हिस हेड
मिचेल मार्श
ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर)
मिचेल स्टार्क
नॅथन लियॉन
स्कॉट बोलँड