शेतकर्‍यांच्या सेवेत भरारी फाऊंडेशनची अवजार बँक रूजू, धानवडच्या ४५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । शेतकरी संवेदना अभियानांतर्गत जळगाव तालुक्यातील धानवड येथील अल्पभूधारक गरीब, गरजू व आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील शेतकर्‍यांच्या सेवेत भरारी फाऊंडेशनची मोफत अवजार बँक आजपासून रूजू करण्यात आली आहे. यात धानवड गावातील 45 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

कृषी विभाग, ममुराबादचे कृषी विज्ञान केंद्र व पद्मालय फार्मर प्रोड्यसर कंपनी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे म्हणून बीबीएफ़ उपकरण मोफत वापरण्यासाठी प्रदान करण्यात आले आहे. आज या उपकरणाचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखविण्यात आले. त्याच सोबत रोटावेटर व जे शेतकरी शेताच्या पिकांमधील तण काढण्यासाठी मजूर लाऊ शकत नाही, त्यांना मोफत तण काढण्यासाठी पावर वीडर देण्यात येणार आहे. यात धानवड गावातील 45 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून 100 एकर च्या वर जमिनिची पेरणी व मशागतिसाठी भरारीची औजार बँक मोफत उपलब्ध करून देण्यात आली, शेतकरी आत्महत्या थांबवन्यासाठी भरारी फाउंडेशन सात वर्षापासून प्रयत्न करीत असून त्यामध्ये या उपक्रमाची भर झाली आहे.

यात भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ममुराबादच्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. वैभव सूर्यवंशी यांनी बीबीएफ उपकरणाची इत्यंभूत माहिती दिली तर पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक राहूल पाटील यांनी बिजोत्पादनाची माहिती दिली तसेज शेती पूरक व्यवसाय शासनाच्या मदतीने कसा उभरता येईल याची माहिती समाधान पाटील यांनी दिली.

या प्रसंगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जळगाव तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत यांच्यासह कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच भाऊसाहेब पाटील, आधार पाटील, नामदेव पाटील, ब्रिजलाल पाटील, शिवाजी पाटील व धानवड गावातील शेतकरी महिला ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी भालचंद्र पाटील, पुखराज पगारिया, रजनीकांत कोठारी, अनिल भोकरे, रवींद्र लढ्ढा, ऍड.किशोर पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, सपन झुनझुनवाला भगवान पाटील यांचे सहकार्य मीळत आहे.