Spark Company: तीन वर्षापासून गुणवत्ता राखल्याने BIS पुरस्काराने स्पार्क कंपनी सन्मानित

Spark Company :  जळगांव : इरीगेशनमधील उत्पादनात सतत तीन वर्षापासून गुणवत्ता राखल्याने जळगांव येथील प्रख्यात स्पार्क इरीगेशन या कंपनीला यंदा BIS द्वारे प्रथमच गुणवत्तेचे स्मृतिचिन्ह देण्यात आले आहे.

नागपूर येथे 6 जानेवारीस झालेल्या कार्यक्रमात कंपनीतर्फे क्वॉलिटी विभागाचे अधिकारी हेमकृष्ण मुंगमोडे यांनी हा पुरस्कार स्विकारला. सलग तीन वर्षांपासून उत्पादनांचे नमुने गुणवत्तेत यशस्वी झाल्यामुळे सुमारे 50 कंपन्यांना हा मान मिळाला. त्यात आपल्या जळगांव येथील स्पार्क इरीगेशन यांचा समावेश आहे.

गुणवत्तेचा पुरस्कार मिळाल्याने कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्पार्क इरीगेशन या नावाजलेल्या कंपनीचे जाळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. या यशा बद्दल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र लढ्ढा व संचालक रूपम लढ्ढा, संचालक मुकेश दहाड यांनी अभिनंदन केले आहे.

स्पार्क इरिगेशन प्रथमपासूनच गुणवत्ता Quality पूर्ण उत्पादनांची निर्मिती करत आहे. या पुरस्कारामुळे आमच्यासह कंपनीच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे. यातून प्रेरणा घेत अधिकाधिक गुणवत्तापूर्ण विविध उत्पादन ग्राहकांना देणार आहेत. या पुरस्कारात कंपनीतील सर्व सहकाऱ्याचे यश आहे.
रविंद्र लढ्ढा, व्यवस्थापकीय संचालक, स्पार्क इरिगेशन