Ayodhya Ram mandir : श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनी जळगाव शहरातील मंदिरे होणार ‌‘राममय’

Ayodhya Ram mandir : अवघ्या चार दिवसांवर येवून ठेवलेल्या अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उंत्कठा व उत्साह शिगेला पोहचला आहे. सीताराम सीताराम नावाच्या नामस्मरणात अवघे देशवासीय मंत्रमुग्ध होत आहेत. हीच उंत्कठा व उत्साह जळगावातील विविध मंदिरांमध्येही दिसून येत आहे. या सोहळ्याचा आनंद या मंदिरांमध्येही साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी 22 जानेवारी, सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ओंकारेश्वर मंदिर
महाबळ रोडवर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंदिरावर डिजीटल स्क्रोलवर माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. या दिवशी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तर पूर्ण मंदिर हे फुलांच्या माळांनी सजविण्यात येणार आहे. यासाठी मुंबई येथून फुले मागविण्यात आली आहेत. पहाटे पाच वाजेपासून त्रिकाल अभिषेक पूजन होईल. पहाटे 5 ते 7, सकाळी 9 ते 12 व संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत षोड:शोपचार पूजनाने अभिषेक होईल. दुपारी 12 व सायंकाळी 6.30 वाजता 108 ची महाआरती होईल. सायंकाळी 1100 दिव्यांनी दिपोत्सव साजरा करण्यात येईल. भाविकांना विशेष प्रसाद व रात्री 9 वाजता दूधप्रसाद वितरण करण्यात येईल. अशी माहिती मंदिराचे विश्वस्त जुगल जोशी यांनी दिली.

दक्ष्ािणमुखी हनुमान मंदिर गोलाणी मार्केट
गोलाणी मार्केटजवळील दक्ष्ािणमुखी हनुमान मंदिरात अखंड रामायणाचे वाचन होईल. दुपारी 12.30 वाजता महाआरती होईल. सायंकाळी दिव्यांची विशेष रोषणाई करण्यात येईल. असे महाराज अशोक तिवारी यांनी सांगीतले.

 

 

सिध्दी व्यंकटेश मंदिर गणपती नगर

गणपती नगरातील श्री सिध्दी व्यंकटेश मंदिर हे फुलांनी सजविण्यात येईल.भगवान बालाजी यांना भगवान राम यांची वेशभुषा करण्यात येईल. यात्रेमध्ये सहभागी होणारी उत्सवमूर्ती यांना श्रीराम, लक्ष्मण,सीता यांची वेशभूषा करून साजश्रृंगार चढविण्यात येईल. सायंकाळी पाच वाजेपासून भजनाचे कार्यक्रम होतील. सायंकाळी 7 वाजता महाआरती होईल. प्रसादाचे वाटप होईल अशी माहिती पुजारी संतोष मिश्रा यांनी दिली.

श्री विठ्ठल मंदिर पिंप्राळा
पिंप्राळा येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात 22 रोजी पहाटे काकडारती होईल. समस्त पांडुरग भजनी मंडळ व वाणी समाज बांधव यांच्यातर्फे भजने सादर होतील. 8.30 वाजता रथमार्गाने नामस्मरण करत ग्रामप्रदक्ष्ाणा काढण्यात येईल. यात भजनी मंडळी, ग्रामस्थांसह बजरंग दलाचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. तसेच महिला मंडळ तुळशी वृंदावन घेवून सहभागी होणार आहेत. पांडुरंग भजनी मंडळ हे एकाच गणवेशात या मिरवणूकीत सहभागी होणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष्ा मोहन वाणी यांनी दिली.

 

ग्रामदैवत श्रीराम मंदिर, जुने जळगाव

22 जानेवारीस पहाटे 5 ते 8 काकडा भजन, काकडा आरती, प्रभु श्रीरामचंद्रांची पुजा- अभिषेक, मंगलारती, विष्णूसहस्त्रनाम पठण, प्रभ श्रीरामचंद्रांचे आराध्य दैवत भगवान श्री शंकरजी यांना रूद्राभिषेक, श्री. सद्गुरू अप्पा महाराजांना श्रीक्ष्ोत्र अयोध्या येथील श्री रामानुज सांप्रदायातील थोर साधू सत्पुरुष श्रीश्री 1008 रामानंद स्वामी यांचेकडून प्रसाद म्हणून मिळालेली प्रासादिक चैतन्यमय प्रभु रामरायांच्या उत्सवमुर्तीस पंचामृताभिषेक, मंगलारती, दुपारी 11 ते 1 या वेळत सामूहिक श्रीराम रक्ष्ाा स्तोत्रपठण, श्रीराम नामजप भजन, कीर्तन व महाआरती. सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत हरीपाठ, भजन, धुपारती. सायंकाळी 7 वाजता शहरातील ब्रह्मवृंद मंडळींचा शांतीपाठ, वेदमंत्रघोष आदी कार्यक्रम होतील अशी माहिती मंदिराचे विश्वस्त तथा गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी सांगीतले.


गजानन महाराज मंदिर, बांभोरी
अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बांभोरी, ता.धरणगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. 22 रोजी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सुंदरकांड, सायंकाळी 4 ते 5 भजन, 5 ते 6 नामजप व रामरक्षा स्तोत्र्‌ापठण आणि सायंकाळी 6 वाजता आरती होईल. भक्तांनी याची नोंद घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संत श्री गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष हभप देवाचार्य अण्णा महाराज पाटील यांनी केले आहे.